शासन निर्णय
मा. मंत्रिमंडळाच्या दिनांक १०.१०.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये, सार्वजनिक प्रकल्पांतील प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन व विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावाचा विचार करून, मा. मंत्रिमंडळाने महामंडळ स्थापनेचा पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:-
-
राज्यातील विविध सार्वजनिक प्रकल्पांतील प्रकल्पबाधितांचे विविध प्रश्न प्रलंबित असल्याने या प्रकल्पग्रस्तांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी थेट माध्यम उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण होण्याची व्यवस्था निर्माण व्हावी.
-
तसेच प्रकल्पग्रस्तांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी रोजगार/स्वयंरोजगार विषयक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य साठी कल्याणकारी योजना राबविणे याकरीता “मा. नागनाथ आण्णा नायकवडी सार्वजनिक प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व विकास महामंडळ” स्थापन करण्यात येत आहे.